भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाचं एक सुवर्ण पान आणि लढवय्या योद्धा म्हणजे आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटील.... इंग्रज या देशातून आपला काढता पाय घ्यायच्या अगोदर चार ते पाच वर्षे या सिंहान इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडत सातारा आणि सांगली (पूर्वीचा दक्षिण सातारा) या वारणामाईच्या खोऱ्यात आणि सहयाद्रीच्या कड्या कपारीत एक लोकाभिमुख शासन व्यवस्थेचा जन्म झाला त्याच नाव होतं "प्रतिसरकार"...!
पण त्याला प्रतिसरकार कमी आणि पत्री सरकार जास्त म्हटलं जायचं...फंद फितूर, किंवा इंग्रज सरकार ला माहिती पुरवणारे,इंग्रजी सैनिक,पोलीस असे लोक जर पत्री सरकारच्या हातात आले तर त्यांना बांधून घालून त्यांच्या पायाच्या तळव्याला तेल लावून रुळाने चोप दिला जायचा...या शिक्षेची दहशत एवढी होती की सहसा कुणी फंदफितुरी करायला धजावत नसत, इंग्रजी सैनिक,पोलिस तर या भागात फिरायला त्यांची छाती दपडायची...पत्रीसरकार ने अनेक लोकाभिमुख कामे केली, बंडाई पुंडाईला वेसण घातलीच परंतु सामान्य जनतेला तत्कालीन इंग्रज सरकारच्या जीवावर उड्या मारणाऱ्या सावकारीच्या ही मुसक्या आवळल्या व सावकारी पाशातून मुक्त केले.सरकारी खजिने लुटणे आणि ते सामान्य जनतेच्या कामासाठी रिकामे करणे हे ही काम पत्री सरकार करे...पत्री सरकारचा न्यायदान कार्यक्रम खूप विशेष असायचा ...
क्रांतिसिंह नाना पाटलांचे नेतृत्व हे या पत्रीसरकार चा आत्मा होता...नानांचा पिंड मूळचा सत्यशोधक समाजाचा....छत्रपती शिवराय,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज , महात्मा गांधी ही त्यांची दैवते.
नानांना एकदा अटक झाली. त्यांना जड आशा साखळदंडानी बांधून न्यायालयात हजर करण्यासाठी नेट असताना त्यांनी त्या जड साखळदंडांच्या सहीत वारणा नदीत उडी घेऊन पोहत सुरक्षित स्थळी पोचले होते..नानांच्या तुफान सेनेचा धसका इंग्रजी सैन्याने घेतला नसेल तर नवल...
नानांनी आपल्या जनतेशी अगदी ग्रामीण आणि रांगड्या भाषेत संवाद साधला..त्यांना आपलंसं केलं.जनता ही नानावर जीवापाड करत असे.
क्रांतिसिंह नाना पाटील,कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगेबाबा यांचं नात खूप घनिष्ट होत. एक आठवण सांगितली जाते
तत्कालीन मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान काही राजकीय कारणास्तव थांबवले.त्यावेळी कर्मवीर अण्णा गाडगेबाबांकडे गेले बाबांनी त्यांच्या जवळ असणारी रक्कम अण्णाना देऊ केली. पण ती कमी पडत होती. बाबा म्हणाले,"भाऊराव मह्याकडे इतकीच रक्कम हाये, आपण सातारला नाना कड जाऊ ,कायना काये तरी करतील त्ये...!
अस म्हणून बाबा आणि कर्मवीर अण्णा सातारला गेले.नानापुढे सर्व हकीकत सांगितली.
नाना म्हणाले,"बाबा, मी पडलो रांगडा गडी, मला काय कुणाकडं मागायला आवडत न्हाय.! अस म्हणून नानांनी पत्रीसरकारच्या भागातील सावकारांना दोन दिवसात रक्कम जमा करण्याचे फर्मान सोडलं.आणि जमलेले पैसे कर्मवीर अण्णांना दिले.अशा प्रकारे रयत वर आलेले संकट गाडगेबाबा आणि नानांच्या प्रयत्नाने दूर झाले...
ब्रिटीश सत्तेविरुद्ध रणशिंग फुंकणारे आद्य क्रांतिवीर उमजीराजे नाईक अथवा अख्खा भारत ज्या ब्रिटिश सत्तेच्या अधिपत्याखाली होता त्या सत्तेला नामोहरम करणारे क्रांतिसिंह नाना पाटील या इतिहासाने दुर्लक्षित ठेवले. ही खंत आहे...!
सागर सोनाई