Wednesday, 12 August 2026

आता तू परत कधीच दिसणार नाहीस...
तू साक्षीदार होतीस...
कित्येक स्वप्नांची पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या..अनवाणी चाललेल्या पावलांची ...
त्यांच्या वेदनांची ...काळजावर उठलेल्या ओरखड्यांची... तू दिसताच..
माझा लोकराजा हसून स्वागत करतोय की काय असच भासायच...
आई अंबाबाई आभाळ पांघरून जणू काही .."आलं बाई माझं मूल " म्हणून कवेत घ्यायची ...माझ्या आजीसारखी...
तुझ्या हाताखालून स्वर्गात प्रवेश व्हायचा..
.म्हणून तुला स्वर्गाचे द्वार कोल्हापूरकरांनी नाव दिलं होतं...
पोटापाण्यासाठी कोल्हापूर सोडताना हजारो मणांच ओझं काळजावर ठेऊन तुझा निरोप घेतला होता...
आत येताना हसत स्वागत करायचीस आणि जाताना डोळ्यात पाणी आणून लांब पर्यंत हात करत... डोळे पदराने पुसत..उभी राहायचीस...परत येईन असं वचन तुला दिलं ....
आलो तेंव्हा कोल्हापुरात प्रवेश केल्यावर तुझ्या पायावर डोकं ठेवलं...
लोकं म्हणाली, "खुळं दिस्त्या ते... दगडांस्नि जीव लावत्या..."
त्यासनी कसं सांगू माणसांपेक्षा दगडांनी कमी घाव दिल्यात...
कोल्हापूर सोडताना तुला सामोरं जाण्याचं धाडस व्हायचं नाही...म्हणून तुला चुकवून शियातन जायचो...
आता तूच मला चुकवलस...कायमची नजरेआड झालीस...माझ्या आजी सारखी.

प्रतिमा सौजन्य (https://x.com/KolhapurSurvey/status/1986398207367410089)


No comments:

Post a Comment

                                                              भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाचं एक सुवर्ण पान आणि लढवय्या योद्धा म्ह...