मान्य मी चुकले...
पण अस नाही की...
तुला समजून नाही घेऊ शकले...
समोर जन्मदाता बाप उभा होता...
पाठीमागे....धारदार कोयता घेऊन उभी..
माझी जन्मदात्री...
काय सांगू तुला...काय घडलं त्या रात्री...
माझी आई माझी नेहमीच मैत्रीण असायची....
काळजात माझ्या ती कायम वसायची...
गृहीत होतं धरलं मी तिला..
आणि सांगून टाकला... माझ्या मनातला प्रेमाचा भाव ओला...
क्षणात माझ्या केसांना पकडून....तिने हिसका देत मला ..
स्वयंपाकगृहात ओढत नेलं...
धारदार विळा गळ्याला लावला..
तिथंच माझं 'मुलगी'पण ...चुलीत गेलं...
जातीच्या बाहेर जर करशील थेरं...!
जिवंत ठेवणार नाहीत त्याला माझी पोरं...
त्याचा काय कार्यक्रम करतील ...मी सांगायची गरज नाही...
त्याच्या जीवाची भीक मागायची गरज नाही....
बापाअगोदर तुझ्या गळ्यावरून मीच फिरवीन सुरा...
जातीच्या बाहेर प्रेम करण्याचा खेळ नाही बरा...
काय करू सांग..काय माझं चुकलं...
जातीमुळं माझं प्रेम सगळ्यांच्याच मनात खुपलं...
माहीत आहे मला....धाय मोकलून खूप रडला असशील...
जिथं जिथं भेटलो तिथं तिथं ..वेदनेनं तडफडला असशील...
तुझ्यासाठीच तर मी माझं मन मारलं होतं...
स्वतःच्या प्रेमाचा बळी देऊन....तुला बाजूला सारलं होतं...
जमलं तर माफ कर मला...
तोडून टाक आपल्या आठवणींचा झुला....
मी चुकीचं वागले असेल कदाचित...
पण इथवरच होतं रे... आपलं संचित...
कदाचित यालाच ...जीवन ऐसें नाव आहे...
आणि प्रत्येक घरात....असाच वाट चुकलेला...
प्रेमाचा गाव आहे...
No comments:
Post a Comment