Wednesday, 8 September 2021

 बाईपण...

बाई होणं सोप्प नसतं रे...
मन मारून जगावं लागतं ...स्वप्नं उरात खोल कुठेतरी...
मन नावाच्या कृष्णविवारात द्यावी लागतात... फेकून..
काळजावर असंख्यांच्या अपेक्षांचं ओझं...आपल्याच वशिंडा वरती संस्कार म्हणून वावरावं लागतं...
रक्त जाळून उजळावे लागते अनेकांचे आयुष्य...
इच्छा नसूनही... पुरुषपणाचा माजलेला बैल घ्यावाच लागतो अंगावर...त्याचं ओझं पेलत पेलत आयुष्याचा प्रत्येक क्षण...जगावा लागतो... जन्मठेपेच्या कैद्यासारखा...
"बा" आणि "आई" हे दोन शब्द जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा "बाई " हा शब्द जन्म घेतो...कळलं का...?
कुरवाळणाऱ्या हातांचा आता स्पर्श जाणवत नाही रे...बुद्धाच्या मायाळू हातासारखा...येशूच्या प्रेमळ नजरेसारखा...
आज काल कुरवाळणारे हात डोक्यावरून हळूहळू छातीवर घसरतात... कळत नाही का मला...
दुसऱ्याचं आयुष्य रेशमी बनवताना...स्वतःच आयुष्य कधी चिंध्या बनून जातं कळतच नाही...
बाईच्या कमरेखालच्या विनोदांना... अमाप प्रसिद्धी मिळते ...मात्र तिचा त्यागाचा चघळून चोथा होतो...
आणि थुंकून टाकला जातो...पिचकाऱ्या मारत...
त्या पिचकाऱ्या तिचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व आपोआपच टाकतात रंगवून... वाटेल त्या रंगात...
स्त्री ला तिच्या स्त्रीत्वाची शरम वाटावी....इतकी अगतिक करते तिला पुरुषी वासनांध नजर...
छाती आणि जांघा एवढ्यापुरतच नसतं रे बाईचं बाईपण...
कधीतरी...
माझ्यासारख्या बाळंतपणाच्या कळा देऊन बघ...
बाईपण अनुभवण्यासाठी...
बाई होणं सोप्प नसतं रे...
- प्रा.सागर कांबळे करवीर

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...