Wednesday, 8 September 2021

 राजा....

असं अर्ध्यावर आम्हाला सोडून जाणं... पचलं नाही बघ...
तुझ्या जाण्यानं या मातीत समतेचा लढा लढणाऱ्या... प्रत्येक योद्ध्यांच्या हातातल्या लेखण्यांनी बंड करून क्षणभर थांबवली आपली लढाई...धाय मोकलून रडत म्हणाल्या,
थांबा रे थांबा....तो पहा आमचा सेनापती....
आकाशाची निळाई पांघरून ...कसा निर्वाणाच्या प्रवासाला चाललाय बघा...
ज्याने अंगावरच्या पांढऱ्याशुभ्र कपड्यांसोबत...
त्या क्रांतिसूर्याशी असणारी निष्ठा जपली....तितक्याच स्वच्छपणे....अंगाला कोणत्याच स्वार्थाचा मळ लागू न देता...
तो विरक्तच राहिला...
कुठल्याही सत्तेच्या आमिषाला बळी न पडता...
आणि फुंकत राहिला क्रांतिसूर्याचे मानवमुक्तीचे रणशिंग.....त्याच्याच भाषेत....
झुगारून दिली त्यानं दलितत्वाची गोणपाट... आणि माणूस हीच ओळख कोरली त्यानं....लाखो हृदयांवर...
किती केले प्रयत्न त्याला मॅनेज करायचे...पण पँथर कुणालाच मॅनेज झालाच नाही...
उलट मॅनेज करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मानेत रुतवत राहिला आपले लेखणीरूपी तीक्ष्ण दात...

राजा ...हा लेखण्यांचा हंबरडा तुला कदाचित ऐकू येत नसेल....डोळ्यांच्या ओंजळीतून बरसणारे अश्रुंचे पाट...कदाचित तुला कळत नसतील...पण तू आज आमच्यातून निघून जाणं.... आमचा आवाज घेऊन गेलं एवढं मात्र निश्चित...कारण तुझ्याइतक निष्ठावान रक्त आजवर तर मला भेटलं नाही....

सागर सोनाई

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...