Wednesday, 8 September 2021

 स्वातंत्र्याचा सोहळा...!

पोट भरलेल्या माणसांनो...
तुमचे आनंद सोहळे आटोपले असतील....तर....
जरा लक्ष द्या..
पोट खपाटीला गेलेल्या भारताकडे....
त्याचं आयुष्य 'लॉक' आणि खिसा 'डाऊन' झाल्यामुळे...
चालतच उपाशीपोटी हजार हजार किलोमीटर....
प्रवास केलाय त्याने....
सर्वकाही ठीक होईल या सनातन आशेने....
तुमच्या कॅमेऱ्याचे फोकस... जरा....पडू द्या....रक्ताळलेल्या... त्याच्या पावलांच्या ठश्यांकडे...
तुमचे चेहरे पाहून ....कॅमेऱ्याचे फोकस ही आत्महत्या करतील...इतक्या पोजेस देऊन झाल्यात तुमच्या...
दलिंदर प्रसिद्धी च्या...
यथावकाश स्वातंत्र्याची शताब्दी ही केली जाईल कदाचित साजरी....
मोठ्या मोठ्या सोहळ्यांनी...
पण इतिहास त्यावेळी तुमच्या कानात तापलेलं शिसे पुन्हा ओतील आणि म्हणेल....
या भारताने भुकेची शताब्दी अगोदरच साजरी केलीय....
हजारो किलोमीटर चा प्रवास करून...
रिकाम्याच पोटाने...
शाळेत मास्तर आम्हाला शिकवायचे 'कोलंबसाचे गर्वगीत'
आणि म्हणायचे 'अनंत अमुची ध्येयासक्ती अन.....!'
पण आज कळतंय...
भूक हीच सर्वात मोठी ध्येयासक्ती आहे...तत्वज्ञान आहे...
त्यापुढे जगातले सर्व धर्म ,धर्मग्रंथ आणि धर्मगुरू शून्य होऊन जातात...
कधीतरी स्वतःच्या कोशाच्या बाहेर येऊन पहा...
माणसं आजही कशी जगतात...
शहाराबाहेरच्या बकाल वस्तीत...
आणि भारत ...?
तो ही तिथेच तुम्हाला भेटेल बरं का..!
...गेली ७४ वर्षे नांदताना...
कारण स्वातंत्र्य फक्त तुम्हाला मिळालं...
मात्र भारत कधीच या माणसांसोबत राहायला निघून आला...
प्रा.सागर कांबळे करवीर
१५ ऑगस्ट,२०२०

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...