रात्र सुद्धा जागते...
होय रात्र सुद्धा जागते...अनियंत्रित वासना ... भागवण्यासाठी...
तर कधी पोटात पडलेला भुकेचा वणवा विझविण्यासाठी...
दोन्हींना नसते मर्यादा ...समाज नावाच्या पहारेकरी सोंगाड्याने घातलेल्या... लाखेच्या पोलादी बेड्यांची....
रात्र जागते...
रेल्वे स्टेशनवर... एसटी स्टॅन्ड वर….आणि पंचतारांकित विमानतळावर ही...
पण बदलतात संदर्भ इथे...
संस्कृतीचे सोंगाडे घोरत पडतात अशावेळी....कारण रेल्वे स्टेशनवर जागणारी रात्र त्यांची कुणीही लागत नाही कदाचित...
आणि एसटी स्टँडवर जागणारी रात्र पोट भरते त्यांचं...
मात्र पंचतारांकित विमानतळावर जागणारी रात्र त्यांची असते...
मखमली आणि चमकदार....…सौ चुहे वाली बिल्ली...
No comments:
Post a Comment