Wednesday, 8 September 2021

 प्रिय लेनिन....

सप्रेम जयभीम...
मी तुला लाल सलाम म्हणणार नाही....
तुझं आणि माझं ध्येय एक असलं...
तरी मार्ग वेगळे आहेत...आपले....
आज तू हसला असशील कदाचित....
तुझा पुतळा जमीनदोस्त होताना पाहून....
मी ही हसलो....कारण पुतळे तोडून विचारधारा नाहीत संपत...
कळत नाही त्यांना...
जेंव्हा जेंव्हा सत्ता अनिर्बंध होते ना...
तेंव्हा तेंव्हा माजावर आलेली मुंडकी जन्म घेतात... अराजकतेच्या पोटातून....
त्यांना मेंदू नसतो रे...
लेनिन...
हा भारत आहे ..अरे चुकलंच...हिंदुस्थान आहे बरं......
जिथं समूहाने वेड्यात काढलं जातं.... माणसांना...
ते म्हणतात तुझ्यानन्तर पेरियार चा नंबर आहे. .
त्यांना कुठं माहितीय...
लेनिन परका होता....मात्र पेरियार वटवृक्ष आहे....या मातीत रुजलेला...त्याला उपटायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या बापजन्मी शक्य नाही...
कारण त्याची मुळं आमच्या काळजात रुतलेली आहेत...
तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला....
- सागर
दि.२२एप्रिल,२०१९

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...