Wednesday, 8 September 2021

 गांधी....

खरंतर तुमचा आणि आमचा वाद जुनाच....
तुमचं मवाळ हिंदुत्व...
या मातीत पेरत होतं... व्यक्तिपूजेचं स्तोम आणि स्वयंघोषित महात्मा म्हणवून घेण्याचं देशी सर्टिफिकेट....
तुम्ही मनपरिवर्तन करण्यावर लय भर दिला...
पण माझा बाप हजारो वर्षांपासून आमच्या काळजाला झालेलं....जातीचं ठसठसणारं गळु...
फोडून...जालीम शस्त्रक्रिया करून...
आम्हाला वेदनामुक्त करण्यात गुंग होता...
तुम्ही घोषित करून टाकलंत स्वतःला भारताचे स्वयंघोषित महात्मा...मसीहा...
त्यावेळी अखंड भारताच्या शोषितांचा मूकनायक मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलात तुम्ही..
तुमचा एकही सत्याग्रह आमच्यासाठी का नाही केलात हो...
आमच्या हक्क आणि अधिकारांवर राम भरोसे बुलडोझर फिरवलात....
असो...
मला तुमचा द्वेष नाही...
पण तुमच्यामुळे आमच्या राजकीय स्वातंत्र्याचा दि एन्ड झाला एवढं मात्र खरं...
बुद्ध म्हणतो...
माणसाबरोबर वैर ही संपतं...
आम्ही संपवलं ते कायमचं...
मात्र तुमच्या मवाळ हिंदुत्वानं आमच्या राजकीय हक्कांचे पाय छाटून टाकले त्याचे परिणाम आजही आम्ही भोगतो आहोत...
लोक म्हणतात तुम्ही माझ्या बापाला घटना समितीत पाठवलंय...
पण घटना समिती ची दारंही माझ्या बापाला बंद करू पाहणारे तुमचे पोलादी अनुयायी तुम्ही का रोखले नाहीत...
ज्या मवाळ हिंदुत्वाला तुम्ही अंजरलत... गोंजारलंत
तेच हिंदूत्व आज जहाल बनून तुमचा रोज खून करताना पाहून....
पीळ पडतो...
गांधी आजही तुमचा असाच खून झाला...
नथुरामच्या औलादीनी पुन्हा केला...
खरं सांगतो...
त्रास आमच्या मनाला झाला...
कारण गांधी ...
तुम्हाला महात्मा आमच्या बापाने बनवलंय...
सागर सोनाई
३१ जाने.२०१९
कदाचित 1 व्‍यक्ती ची प्रतिमा असू शकते



No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...