Thursday, 27 July 2023

शिवबा...



 तू काल ही आमचा राजा होतास...

आजही आमचा राजा आहेस ...
आणि उद्याही आमचा राजाच राहशील....
कारण तू आमच्यापर्यंत व्हाया तुकोबा .... जोतिबा... शाहुबा... भीम बाबा...असा आला आहेस शिवबा...
तूच पहिला... ज्यानं आमच्यातला क्षत्रियत्वाचा अंगार जिवंत केला....आणि हातात तलवारी दिल्या...आपल्या पंगतीला बसवलं... गणगोत बनवलं...आम्हाला आपलं मानलंस..
आम्हीही छातीचा कोट करून तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या संरक्षणासाठी आमचं रक्त सांडलं ..
तुझीच प्रेरणा घेऊन जोतिबा उभा राहिला .... शाहुराजा आमचा माय बाप बनला....आणि बाबासायबानं चवदार तळ्याचा लढा उभा केला...
तुझी तलवार कधी गरिबावर चालली नाही...
सत्तेचा माज आणि धर्माची मस्ती तुझ्यासमोर कधीच रुजली नाही...
ज्यांच्या हातात लेखण्या होत्या त्या कलम कसायांनी तुला पाहिजे तसं रेखाटलं...
पण अजून ही रयतेच्या उरात तुझा सोन्यासारखा इतिहास जिवंत आहे...
ती कोल्हेकुई ...सिंहाच्या डरकाळीची बरोबरी करणार नाही राजा...तू सिंहाची डरकाळी होतास...नव्हे तर सिंह च होतास...
तू हवा होतास आज...

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...