Thursday, 27 July 2023

 माझी सुपर मॉम...

आभाळ भरून आलं नसतानाही...
अचानक अंगावर पावसाचे थेंब...वर्षवू लागतात...
तेंव्हा रडत असते.. माझी आई ...
सर्वांच्या सुखदुःखात मात्र सामील होत असते...
आपलं दुःख बाजूला ठेऊन...
सर्व जगच चांगलं आहे...कुणाचंच होऊ नये कधी वाईट...
म्हणून मनोमन प्रार्थना करत असते माझी आई...
दुसऱ्यांना मोलाचा आधार आणि सल्ला देत राहते ...
मळलेली वाट सोडू नका...सांगत राहते माझी आई...
कधीतरी लेक माझा लागेल चांगल्या नोकरीला...
फेडील माझ्या डोळ्यांचं पारणं...
म्हणून अनंत वेदना आणि कुजके ,नासके टोमणे ...
खात राहते माझी आई...
कळत नाही कुठे आणि काय बोलावं...
जगच सारे इनोसंट ...समजते माझी आई...
सर्वांच्या भल्याचा विचार करूनही ....
तिलाच ठरवली जाते ...चूक तेंव्हा...
हमसून हमसून रडते माझी आई...
जाईन कधीतरी मी ..माझ्या स्वतःच्या घरात...
पूजीन उंबरठा ...तुळस लावीन दारात...
मनात चिंतत राहते... माझी आई...
डोळ्यातली निरागस आस..घायाळ करते मला..
जेंव्हा हा प्रश्न विचारते मला...माझी आई...
चिडावं ..रागवाव... वाटत नाही मला कधीही...
तिच्या चेहऱ्याकडे पाहत जपतो मी...
माझी आई...
रुढार्थाने ती नसेल सुपर मॉम..
पण मैल न मैल डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे विकून...
लेकराचा जीव वाचवते ...माझी आई...
जगातली सर्वात शक्तिमान असते...माझी आई...
खरंच सुपर मॉम असते ...माझी आई...
प्रा.सागर मा.कांबळे

No comments:

Post a Comment

गुल्या मामा

  गुल्या मामा... माझं लहानपण येवतीला गेला...माझ्या जडणघडणीत या गावाचं खुप मोठं योगदान आहे..हे गाव म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू...माझ्या ...